श्रध्देय कर्मयोगी शंकरराव पाटील यांची १०१ वी जयंती आज लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये उत्साहात साजरी...


श्रध्देय कर्मयोगी शंकरराव पाटील यांची १०१ वी जयंती आज लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये उत्साहात साजरी...

महाशाही न्यूज मराठी  :- गणेश धनवडे 
ऋषितुल्य,निष्कलंक, अजातशत्रू असणारे, इंदापूर तालुक्याची शैक्षणिक, सामाजिक, कृषी व राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे श्रध्देय कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊ) यांची १०१ वी जयंती आज लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये साजरी करण्यात आली.


 कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्री.सदाशिव दगडे सर, प्राचार्य श्री.आवारे सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या  हस्ते भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका सौ.मनिषा गायकवाड  यांनी केले. प्रास्ताविकातून भाऊंनी तालुक्यात केलेल्या विकास कामांचा, शैक्षणिक संस्था व सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. श्री.वैभव सोलनकर सर यांनी भाऊंच्या साध्या राहणीमान व उच्च विचारसरणी, वैयक्तिक शिस्त ,वक्तशीरपणा या विषयी घडलेले अनुभव सांगितले.


 कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सदाशिव दगडे सर यांनी भाऊंच्या जीवनातील आठवणी जाग्या केल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांने भाऊंचे चरित्र अभ्यासणे गरजेचे आहे असे विचार मांडले.
       कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रांजली सावंत व कु. समृध्दी नरूटे यांनी तर‌ आभार कु.समृध्दी खरात हिने मानले.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...