बार्शी तालुक्यातील खून प्रकरणाचा बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावून दोन आरोपींना केले गजाआड...


बार्शी तालुक्यातील  खून प्रकरणाचा बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावून दोन आरोपींना केले गजाआड...
[ महाशाही न्यूज मराठी ]
बार्शी तालुक्यातील  खून प्रकरणाचा बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे. ऊसाच्या शेतात पुरलेले प्रेत आढळल्यानंतर  परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु , पोलिसांच्या  तपासामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


या बाबतची सविस्तर माहिती अशी की  बाभुळगाव येथील सुरेश रंगनाथ शिंदे ( वय 68 वर्षे ) हे 17 फेब्रुवारी रोजी बार्शीवरून आपल्या गावी निघाले, मात्र ते घरी पोहोचले नाहीत. त्यांच्या मुलाने बराच  शोध घेतला, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.

20 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता बाभुळगाव येथील ऊसशेतीमध्ये मानवी पाय दिसल्याने खळबळ उडाली. बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता, दोन्ही हात बांधलेले आणि गळ्यावर आवळल्याच्या खुणा असलेला मृतदेह आढळला.




तपासादरम्यान सुरेश शिंदे यांच्या शेजारील दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि बाभुळगाव येथे सालगडी म्हणून काम करणारा राहूल नागेश गायकवाड ( रा. कडलास, ता. सांगोला ) यांचा या हत्येत सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी लुटीसाठी हत्या केल्याची कबुली दिली.

ही धडाकेबाज कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, तसेच बार्शी शहर व तालुका पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

या जलद तपासामुळे परिसरातील भीतीचे वातावरण निवळले असून, पोलिसांच्या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...