कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले विद्यालय बिजवडी येथे ॲनिमिया मुक्त शाळा अभियान... महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे ४६५ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न. सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता महात्मा फुले विद्यालय बिजवडी या शाळेतील विद्यार्थ्यांची कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त अंजली माशेलकर फाउंडेशन स्व- रूपवधिर्नी आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमिया मुक्त शाळा अभियान शालेय मुला-मुलींसाठी नि :शुल्क हिमोग्लोबिन , बी एम आय, उंची ,वजन , विद्यार्थ्यांना ॲनिमिया होऊ नये म्हणून ही आरोग्य तपासणी करण्यात आली.
आरोग्य तपासणी वेळी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर , विश्वस्त अरविंद गारटकर , ट्रस्टचे मार्गदर्शक हमीदभाई आत्तार ट्रस्टचे दीपक जगताप , सागर कांबळे, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर, गौरी राठोड, सानिका फुलारी वॉर्डबोय आनंद नलावडे शिवाजीराव गोफणे,कोपी वरच्या शाळेचे प्रमुख भारत बोराटे सर, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास फलफले,काळे.सी.एम. मेंगाळ बी.जी. साखरे पी एन, पोळ के एम, जाधव एस एस, माने आर एच, माळी एस बी, हुबाले एस बी,झगडे मॅडम ,कचरे मॅडम ,गलांडे मॅडम ,जाधव मॅडम पडळकर मॅडम , ॲनिमिया मुक्त शाळा या उपक्रमासाठी स्व: रूपवर्धिनी या संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, संस्थेचे कार्यवाहक विश्वास कुलकर्णी, योगेश तांबट, रविराज पाटील, बापू शिंदे ,संजय तांबोळकर, निशिकांत भालेराव ,प्रसाद महाजन, विठ्ठल शिंदे, राहुल जोशी, प्रताप घुटुकडे , यावेळी ४६५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.