निमसाखर ता. इंदापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न...


निमसाखर ता. इंदापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न...
महाशाही न्यूज मराठी  :- गणेश धनवडे 
निमसाखर गावात सालाबादप्रमाणे शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


दिनांक 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान गावातील महिला, मुले आणि नागरिक यांच्यासाठी समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी अकलूजचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ एम के इनामदार यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी व प्रथम उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. 


या कार्यक्रमास डॉ एम के इनामदार, युवासेना सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, मंडल अधिकारी सतिश गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी गणेश लंबाते, कृषी सहाय्यक श्रद्धा घोडके, माजी ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे, कृषी सहाय्यक मार्तंड देवडे, पशुधन पर्यवेक्षक डॉ अमोल क्षीरसागर आदी मान्यवर मंडळींनी भेटी दिल्या. व यावेळी गावातील नागरिकांनी उपस्थित सर्वांचा सत्कार केला


यानंतर दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व दुपारी मुली व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा गावातील रेशीमगाठी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. 


यावेळी विजेत्या महिलांना कला शिक्षक कुंभार सर यांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तर प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रकाश रणसिंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

रात्री 8 वाजता गावातील मुख्य राजवाडा येथे प्रसिद्ध संमोहनतज्ञ गणेश सप्रे यांच्या हिप्नॉटिझम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गावातील लहान मुलांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी गावातील विविध शिक्षक व पोलीस बिट अंमलदार विकास निर्मळ, हवालदार महेश पवार यांच्या हस्ते शिवप्रतिमा पुजन करुन पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुले, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, गावातील सर्व शिवभक्त यांनी ढोलपथक, हलगी वादक यांच्यासमोर ठेका धरला. आकर्षक रथातून भव्य शिव मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. 

मिरवणुकीनंतर श्री विठ्ठल मंदिर येथे सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास 400 हून अधिक लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तर रात्री मुलांसाठी संगीत खुर्ची, डान्स व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्याचे हे 14 वे वर्ष होते.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...