पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणी डेपोमधील तब्बल 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. 

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे.त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा केली. 

तपास गंभीरपणे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.  या बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे स्वारगेट बसस्थानकातील डेपोमधील तब्बल 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी कारवाई केली आहे. 

उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेशही परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत.  स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांना चौकशी करुन या प्रकरणात एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे. 

तसेच शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन बसची पाहणी केली तसंच घटनेची माहिती घेतली. शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर बलात्कार झाला होता. याबाबत त्यांनी पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या आहेत.  

सदर आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असे आहे. आरोपी हा जामीनावर बाहेर होता.  पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातून तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली होती. तरुणीला फलटणला जाणारी बस हवी होती , परंतु त्या नराधमाने  तीला दुसऱ्या बस मध्ये बसायला सांगितले आणि त्याचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केला. आरोपीवर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. त्याला शोधासाठी आठ पथक तयार करण्यात आली आहेत.  

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...