कळंब तालुका इंदापूर येथील वालचंद विद्यालय व जुनियर काॅलेज चे HSC परीक्षेत घवघवीत यश..


कळंब तालुका इंदापूर येथील वालचंद विद्यालय व जुनियर काॅलेज चे HSC परीक्षेत  घवघवीत यश.. 
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे 
ग्रामीण विकास प्रतिष्ठान कळंब संचलित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब ता- इंदापूर जि- पुणे कॉलेजचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड तर्फे घेण्यात आलेल्या एचएससी फेब्रुवारी /मार्च 2024 बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब या विद्यालयातील विज्ञान शाखेतील एकूण 99 विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते 99 विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला.
 

तसेच वाणिज्य शाखेत एकूण 69 विद्यार्थी परीक्षेत बसले असून 69 विद्यार्थी पास होऊन वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला तसेच कला शाखेमध्ये 87 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील 83 विद्यार्थी पास होऊन कला शाखेचा निकाल  एकूण 95.40% लागला तरी ज्या विद्यार्थ्यांनी तिन्ही शाखेत उत्तम यश मिळवलेले आहे त्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे
कला शाखा
कु. पोळ सिद्धी मनोहर प्रथम क्रमांक 79.66%
कु.भालेराव प्राजक्ता संजय द्वितीय क्रमांक 78.83%
कु. हेगडे कांचन दत्तात्रय तृतीय क्रमांक 73.50%
कु. चव्हाण प्रियंका चव्हाण तृतीय क्रमांक 73.50%

वाणिज्य शाखा
कु. पवार प्रज्योत सुनील प्रथम क्रमांक 80 टक्के
कु. गुलाल जगदीश रामभाऊ द्वितीय क्रमांक 78.67 टक्के
कु. तुपे पायल सोमनाथ तृतीय क्रमांक 77.83%

विज्ञान शाखा
कु. चव्हाण प्रेरणा गणेश प्रथम क्रमांक 89.33%
कु. निंबाळकर मानसी घनश्याम द्वितीय क्रमांक 86%
कु. रुपनवर आकाश सुभाष तृतीय क्रमांक 84.67%

सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे ग्रामीण विकास प्रतिष्ठान कळंब संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र दादा कदम उपाध्यक्ष श्री मधुकर जी पाटील संस्थेचे सचिव सूर्यभान  मोहिते सर्व सदस्य सदस्या विद्यालयाचे प्राचार्य श्री सर्वगोड सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले  व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...