जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंद्रेवस्ती, शाळेचा शंभर टक्के निकाल.
इंदापूर तालुका प्रज्ञाशोध ही परीक्षा पंचायत समिती इंदापूर मार्फत घेण्यात आली. यासाठी मा. गटविकास अधिकारी व मा.गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता तिसरी इयत्ता चौथी या वर्गाचे विद्यार्थी परीक्षेस बसवण्यात आले होते.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंद्रे वस्ती शाळेची 100% विद्यार्थी पास झाले.
तसेच इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु.तृप्ती किरण रणवरे
हिला 86% गुण मिळाले. तृप्तीचा इंदापूर तालुका प्रज्ञाशोध परीक्षेत
निमसाखर केंद्रामध्ये प्रथम क्रमांक
तसेच तालुक्यामध्ये 11वा क्रमांक आला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करण्यात आले. यासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री. भिवा हगारे व विस्तार अधिकारी श्री. मुगळे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
पालकांनी शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला


