पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%


पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%
[ महाशाही न्यूज मराठी :- रणवरे संभाजी ]
इंदापूर ( दि.२७ मे २०२४ )-: दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी निरवांगी संचलित पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. हनमंतराव पोळ, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव पांडुरंग पाटील, संस्थेचे सर्व विश्वस्त विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी प्रथम कु. किसवे त्रिशा तानाजी - ९४.४०%, द्वितीय कु. नांगरे अर्चना दत्तात्रेय ९२.४०% व बोराटे राजनंदनी आप्पासो ९२.४०, तर तृतीय क्र काळे वैष्णवी विष्णू ९२.२०%  याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक  के. एच. शिरसट  यांनी निकालाबाबतची सविस्तर  माहिती दिली.

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..