ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे ज्येष्ठांसाठी हनुमंत कुंभार सचिव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) पुणे यांचे व्याख्यान...
ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे ज्येष्ठांसाठी हनुमंत कुंभार सचिव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) पुणे यांचे व्याख्यान...
आज वार शनिवार दिनांक.25/5/2024 रोजी ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक मीटिंग संपन्न झाली. ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या महिन्यातील ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यात आले
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री हनुमंत कुंभार सचिव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभाग यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन केले ज्येष्ठांसाठी कोणकोणत्या सरकारी योजना आहेत त्या योजनांची माहिती त्यांनी सांगितली. ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर यांचे कार्य महान आहे विविध उपक्रम या संघाद्वारे राबवले जातात ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर ,ज्येष्ठांसाठी सहलींचे आयोजन , सण उत्सव एकत्र साजरे केले जातात ही बाब अतिशय चांगली आहे. म्हणून आपल्या संघाची लोकप्रियता पुणे जिल्ह्यामध्ये आहे. बाबासाहेब घाडगे यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन केले ,तसेच मीटिंग चे अध्यक्ष अशोक भाऊ गानबोटे यांनी जेष्ठांना विविध योजनांची माहिती सांगितली. आभार श्री महादेव चव्हाण सर यांनी मानले. मीटिंग नंतर अल्पोपहार चहापान घेऊन मीटिंग खेळिमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी भारत बोराटे सर, सिकंदर इनामदार, चेअरमन तावरे गुरुजी, मेजर राजेंद्र गलांडे, सर्व ज्येष्ठ उपस्थित होते.



