निमसाखर गावात आणी रणमोडे वस्तीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे नुकसान..
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्याने 33 केव्ही चे पोल ही पडले आहेत.
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्याने 33 केव्ही चे पोल ही पडले आहेत.
आणि रणमोडे वस्ती तील अनेक झाडांची पडझड झाली त्याचबरोबर सौर ऊर्जेचे प्लांट ही उध्वस्त झाले आहेत घराचे छत शेड ही उडून गेली आहेत एवढेच नाही तर अनेक गाड्या उलथून पडल्या आहेत.
नारायण लक्ष्मण रणमोडे यांचे शेड पडले तसेच नानासाहेब सर्जेराव रणमोडे व दत्तात्रय यशवंत सूर्यवंशी यांचा सौर ऊर्जेचा प्लांट उलटून पडला आहे.
तरी प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी रणमोडे वस्तीवरील ग्रामस्थांची मागणी करण्यात येत आहे.