भगवंत भजन रचनाकार व गायक विजय थोरात [ कोरे ] यांचा भगवंत महोत्सवात भगवंत मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार..
भगवंत भजन रचनाकार व गायक विजय थोरात [ कोरे ] यांचा भगवंत महोत्सवात भगवंत मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार..
[ महाशाही न्यूज मराठी ]
बार्शी येथे चालू असलेल्या भगवंत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 15 मे 2024 रोजी नारदीय कीर्तनाच्या प्रारंभी विजय थोरात [ कोरे ] यांचा भगवंत मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बार्शी येथे चालू असलेल्या भगवंत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 15 मे 2024 रोजी नारदीय कीर्तनाच्या प्रारंभी विजय थोरात [ कोरे ] यांचा भगवंत मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते बसवराज पुरवंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून भगवंत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना सत्कारमूर्ती विजय थोरात [ कोरे ] यांच्या संदर्भात पुरवंत म्हणाले की, विजय थोरात यांना ईश्वर भक्तीचे बाळकडू त्यांच्या आजोबा व आईपासून मिळालेले आहे . त्यांच्या घरातच भक्तिमय वातावरण निरंतर फुलत असल्याने थोरात यांनी पहिली रचना श्री स्वामी समर्थावर केली आणि दुसरी रचना श्री गणेशावर केली. त्यानंतर त्यांनी बार्शीच्या भगवंतावर एकूण 18 रचना दिल्या असून त्या त्यांच्याच आवाजात स्वरबद्ध केल्या आहेत.
आणखीन सात रचना साकारल्यानंतर ते एकूण 25 रचनांची एक छोटीशी पुस्तिका प्रकाशित करून भगवंत चरणी अर्पण करण्याचा त्यांचा मनोदय असल्याचेही सांगितले.
भगवंतांच्या नामस्मरणाची त्यांच्या आवाजातील धून ने मंदिरातील भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते .
भगवंत मंदिर कमिटीचे श्री. बुडूख दादा, श्री. कुलकर्णी व अन्य सदस्यामार्फत भगवंताची प्रतिमा, पुस्तिका, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल विजय कोरे यांचा सर्व स्तरावरून कौतूक केलं जात आहे