पंढरपूरात पोलीस नाईक 50 हजाराची लाच घेताना अँटी करप्शन च्या जाळ्यात..
[ महाशाही न्यूज मराठी ]
या बाबत घडलेली सविस्तर माहिती अशी की मोटार सायकलच्या गुन्ह्यात तक्रारदारास आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी 1 लाखाची लाच मागीतली होती.
या बाबत घडलेली सविस्तर माहिती अशी की मोटार सायकलच्या गुन्ह्यात तक्रारदारास आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी 1 लाखाची लाच मागीतली होती.
तडजोड करून 50 हजार रुपये ठरले होते ते स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैजिनाथ संदिपान कुंभार, वय 52 वर्षे, पद पोलीस नाईक, ब.नं. 380, पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण रहाणार अर्थव बिल्डींग, ब्लॉक नं.207 , पुजारी सिटी, इसवावी पंढरपूर तालुका पंढरपूर, जिल्हा. सोलापूर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गु.र.नं. 44/2024, भा. द.वि. संहिता 1860 चे कलम 279, 337,338 व मोटार वाहन अधिनिय 1988 चे कलम 134 [ ए ], 134 [ बी ] 177 , 184 प्रमाणे अज्ञात वाहनाविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदार यांची मोटार सायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्हयात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासठी यातील लोकसेवक वैजिनाथ संदिपान कुंभार, यांनी तक्रारदार यांचेकडे 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंति ठरलेली 50 हजा रुपये लाच रक्कम मान्य करुन सदरची लाच स्वतः स्वीकारल्याने
सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार पोहेकॉ अतुल घाडगे, पोहेकों सलीम मुल्ला, पोना स्वामीराव जाधव, चापोकों शाम सुरवसे, सर्व नेम. ला.प्र.वि., सोलापूर यांनी केली



