शासकीय गोदामात ईव्हीएम , 36 दिवस कडेकोट बंदोबस्तात ; राहणार..!


शासकीय गोदामात ईव्हीएम , 36 दिवस कडेकोट बंदोबस्तात राहणार..!

36 दिवस येथे 24 तास यंत्रणांची नजर राहणार आहे. चारही बाजूने या परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ही कार्यान्वित करण्यात आली आहे..


यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 225 मतदान केंद्रांवरील [ ईव्हीएम ] शनिवारी रात्री कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत यवतमाळ   येथील दारव्हा मार्गावरील शासकीय धान्य गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. ही  मतदान यंत्रे पुढील 36 दिवस येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहणार आहेत. त्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे सतर्क  अभियान सुरू आहे.

दुसऱ्या टप्यात तब्बल 62.87 % मतदान झाले आहे . 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 1.78% नी वाढले आहे. मतदानानंतर  शुक्रवारी मतदान पार पडल्यानंतर राळेगाव, दिग्रस, पुसद, वाशिम, कारंजा आणि यवतमाळ येथील मतदान यंत्रे यवतमाळात शनिवारी कडेकोट सुरक्षेत आणण्यात आली. येथील शासकीय गोदामांत ही यंत्रे ठेवण्यात आली असून, त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असलेली ‘स्ट्राँग रूम’ तयार करण्यात आली आहे.

पुढील 36 दिवस या ठिकाणी चोवीस तास  या परिसरात चारही बाजूने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. यात प्रथम स्तरात सेंट्रल आर्म पोलीस फोर्स         [ सीएपीएफ ] ,दुसऱ्या स्तरावर स्टेट आर्म पोलीस फोर्स [ एसएपीएफ ] आणि तिसऱ्या स्तरावर सर्व प्रवेश द्वारांवर स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चारही बाजूने त्या ठिकाणी शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परिसरात जवळपास 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत या कॅमेऱ्यांवर नियंत्रण कक्षातून चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

या स्ट्राँगरूमलाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह निवडणूक विभागाच्या निरीक्षकांनी भेट देवून पाहणी करून या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्राँगरूमला ‘सील’ करण्यात आले आहे . या परिसरात राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 24 तास तीन शीफ्टमध्ये ड्युट्या लावण्यात आल्या आहेत .

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...